esakal | वरुणराजा बरसला! मुसळधार पावसाने चौकांचे झाले तलाव..पुढचे इतके दिवस दमदार बरसणार ... 
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur experienced heavy rain today read full story

सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन, नागरिकांना दिलासा मिळाला.

वरुणराजा बरसला! मुसळधार पावसाने चौकांचे झाले तलाव..पुढचे इतके दिवस दमदार बरसणार ... 

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने रविवारी नागपूर शहरात जोरदार बॅटिंग केली. हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरवत वरुणराजाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन, नागरिकांना दिलासा मिळाला. 

क्लिक करा -  पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..

अचानक दाटून आले आणि...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भ व मध्य प्रदेशात ढगांची दाटी झाली आहे. दुपारपर्यंत ऊन व उकाडा जाणवल्यानंतर अचानक चारच्या सुमारास आभाळ दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी बरसल्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. 

खोलगट भागांमध्ये साचले पाणी

जवळपास अर्धा ते पाऊण तास रामदासपेठ, सीताबर्डी, मानेवाडा, महाल, बेसा, बेलतरोडी, सदर, काटोल रोडसह शहरातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. रस्‍त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. नरेंद्रनगर, लोखंडी पूल, सीताबर्डी, महाल, मेडीकल चौक, त्रिमुर्तीनगर, पडोळे चौकासह ठिकठिकाणी खोलगट भागांमध्ये कुठे गुडघाभर, तर कुठे मांडीपर्यंत पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या.

जाणून घ्या - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

विदर्भात आणखी जोरदार पावसाचा इशारा 

विदर्भातील ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती जिल्ह्यांतही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागानुसार, विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे. नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image