Nagpur District: बोगस बियाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश;कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई ; ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Fake Seed Racket Exposed in Nagpur Rural Area: नागपुरात बोगस बियाण्यांच्या मोठ्या रॅकेटचा कृषी विभाग व पोलिसांनी पर्दाफाश केला असून ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Nagpur District

Nagpur District

esakal

Updated on

द्रुगधामना: खरीप हंगाम तोंडावर असताना नागपूर ग्रामीण तालुक्यासह परिसरात बोगस बियाण्यांचे रॅकेट सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून निकृष्ट व बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत नागपुरात बनावट बियाण्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com