

Nagpur Family of Five Missing
Esakal
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धंतोली परिसरात राहणारे जितेंद्र परसवानी यांच्यासह कुटुंबातील ५ जण २४ जूनला घरातून निघून गेले आहेत. त्यानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क झालेला नाही. या प्रकरणी जितेंद्र परसवानी यांचे काका श्यामसुंदर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता झाल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.