नागपूर : मदतीसाठी जुन्याच निकषांचा आधार; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

मदतीसाठी प्रशासनाने जुन्याच निकषांचा आधार घेतल्याने शासनाकडून अहवाल परत पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
crop insurance
crop insurancesakal
Updated on

नागपूर : अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्‍यात मदतीची रक्कम वळता करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही रक्कम न मिळाल्याने सरकारची घोषणा फोल ठरली. मदतीसाठी प्रशासनाने जुन्याच निकषांचा आधार घेतल्याने शासनाकडून अहवाल परत पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती उद्भवली. तर पाऊसही सतत पडला. त्यामुळे हातचे पीक गेले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेले हास्य गेले. यावर्षीही त्यांना तोटाच झाला. सरकारने मदत देण्याचे जाहीर केले. दरम्यानच्या काळात सरकारने मदतीच्या रकमेत वाढ करून निकषातही बदल केले. पूर्वीच्या सरकारने सर्वच प्रकारच्या शेतीसाठी समान मदत रक्कम केली होती. या सरकारने जिरायती व बागायती असा निकष पुन्हा लागू करता जिरायतीसाठी हेक्टरी १० हजार तर बागायतीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.

crop insurance
पुणे : मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे पंचनाम्यास विलंब झाला. आता प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला. नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे १ लाख हेक्टरवर पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असून १ लाख ५० हजार शेतकरी बाधित झाले. ८५ कोटी ४४ लाखांच्या मदत रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

तर पूर व अतिवृष्टीमुळे जवळपास २० हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले असून २८ हजार शेतकरी बाधित झाले. त्यांच्यासाठी १३ कोटी ९३ लाखांच्या मदतीचा अपेक्षा करण्यात आली. परंतु प्रशासनाने हा प्रस्ताव जुन्याच निकषाच्या आधारे पाठविला. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाने परत पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आता नव्याने सुधारित प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतरच मदत मिळणार आहे. आता चार दिवस सुटी असल्याने दिवाळीनंतरच ही रक्कम शेतकऱ्यांना मिळेल.

crop insurance
मुंढवा : गळती निवारण्याकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

असे आहे निकष

पूर्वी जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० तर तर बागायती शेतपिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी हेक्टरी १३५०० रुपये निकष होते. तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८००० हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत होते. महाविकास आघाडी सरकारे आता जिरायती शेतपिकांसाठी हेक्टरी १०००० हजार तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १५००० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com