esakal | Nagpur: आठ दिवसांत पंचनामे, नंतर मदत : विजय वडेट्टीवार
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

आठ दिवसांत पंचनामे, नंतर मदत : विजय वडेट्टीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. कोकणनंतर मराठवाड्यावरही आभाळ कोसळले असून केंद्रानेही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सैल करावा अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपने या मुद्द्यावर राजकारण करू नये असा सल्लाही दिला.

महाराष्ट्रातील ३५२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पंचनामे झाल्यावर ओल्या दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत पंचमाने पूर्ण केले जातील. अतिवृष्टी संदर्भात प्रत्येक कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा होते असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची जी भूमिका आहे तीच आमचीसुद्धा आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीवर कोणी राजकारण करू नये. केंद्र सरकारचेही शेतकऱ्यांना मदत करण्याचे कर्तव्य आहे. विरोधकांचा रोख आमच्याकडे असेल तर आमचा रोख केंद्र सरकारकडे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्या जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

loading image
go to top