

Nagpur Loan waiver
esakal
नागपूर: राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील ६२ हजार ५४८ शेतकऱ्यांची माहिती बँकांनी पोर्टलवर अपलोड केली असून, त्यापैकी २४ हजार ३२२ शेतकरी पहिल्या टप्प्यात पात्र ठरल्याची माहिती माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.