

Bachchu Kadu: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, अजित नवले आणि इतर शेतकरी नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारच्या वतीने मंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्री पंकज भोयर दाखल झाले आहेत.