

Sweet Factory Raid News
esakal
Food business license cancelled after a dead rat was found in the sweet manufacturing area
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धास्ती सध्या हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ उद्योगातील लोकांना बसलेली आहे. मात्र काही लोक या धडक कारवायांकडे दुर्लक्ष करीत निर्ढावलेपणाने वागत आहेत. नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका स्वीट होममध्ये पदार्थ बनविण्याच्या ठिकाणीच मेलेला उंदीर आढळून आला आहे.