IAS Officer Tukaram Mundhe
esakal
नागपूर : प्रशासनात दरारा असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Officer Tukaram Mundhe) यांनी नुकताच अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यासोबतच हा विभाग ‘फूलचार्ज’ झाला असून राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी धडक कारवाई करीत भेसळीचा संशय असलेला सुमारे ४.७२ लाखांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे.