

Illegal Sale of Abortion Pills in Nagpur FDA Seizes Banned Medicines and Registers Case Against Pharmacy Owners
esakal
नागपूर: गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसह नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अल्प्राझोलाम गोळ्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या गंजीपेठ येथील औषधविक्रेत्यां भागीदारांविरोधात गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.