
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ६८ प्रशिक्षित प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २७) रोजी या सर्वांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. पावसाळा आणि दिवाळीच्या कालावधीत उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.