Nagpur:उपराजधानीत होणार पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक लेखनावर होणार चर्चा

भारतीय मुस्लिम परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १८ फेब्रुवारीला पंचशीलचौक येथील टिळक पत्रकार भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
Nagpur:उपराजधानीत होणार पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक लेखनावर होणार चर्चा
Updated on

Muslim Marathi Literature Summit: भारतीय मुस्लिम परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १८ फेब्रुवारीला पंचशीलचौक येथील टिळक पत्रकार भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. मराठी साहित्य सार्वस्वतात मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह स्थिरावला असून संमेलनात कथा, कादंबरी, वैचारिक लेखन, ऐतिहासिक लेखनावर राज्यभरातील लेखक चर्चा करणार आहेत.

पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात प्रा फ. म. शहाजिंद (लातूर), अॅड. फिरदोस मिर्झा (नागपूर), प्रा. युसूफ बेन्नूर (औरंगाबाद), निरंजन टकले (नाशिक), प्रा. मुहिद कादरी (उस्मानाबाद), डॉ. अमिताभ पावडे (नागपूर), जगजित सिंग (नागपूर), डॉ. शाहीद जाफरी (नागपूर), शकील पटेल

(नागपूर), प्रा. दशरथ मडावी (नागपूर), शालिक जिल्हेकर (नागपूर), अब्दुर कादर मुकादम (मुंबई), प्रा. अनिस बेग (वर्धा), प्रा. सय्यद अल्लाउद्दीन (बीड), डॉ. रफिक शेख (नाशिक), डॉ. रोशन खान (नागपूर), प्रा. मनोहर नाईक (नागपूर), डॉ. भोला सरवर (नागपूर), दत्तात्रय कल्याणकर (धुळे), स्नेहा फदाले (मुंबई), अंजना कर्णिक (मुंबई), सुप्रिया गोटेकर (अकोला), वकील अहमद शेख (आलापल्ली), डॉ. प्रकाश राठोड विविध परिसंवाद, मुक्त चर्चेत सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

या संमेलनाच्या आयोजनासाठी प्रा. रमेश पिसे, प्रा. असलम बारी, डॉ. वहीद पटेल, रजनी बोधी, फिरोज अहमद, अॅड. वकील अख्तर, हिफजुर्रहमान खान, वहीद खान, सुषमा कळमकर, मिर्जा वहाब बेग, राजीक खान, मोहसीन शेख, हनिफ कुरेशी, आबिद कुरेशी, सय्यद मुजम्मील परिश्रम घेत आहेत. भारतीय मुस्लिम परिषद, फुले आंबेडकरीय विचार मंच यांच्या सहकार्यातून हे संमेलन होत आहे. माहितीसाठी ८४५९५६३४८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Nagpur:उपराजधानीत होणार पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक लेखनावर होणार चर्चा
Smart Toothbrush Hacked : 'स्मार्ट टूथब्रश'देखील होऊ शकतात हॅक? व्हायरल बातमीमधील दाव्यात किती आहे तथ्य?

पथनाट्याचे सादरीकरण

■ उपराजधानीत होणाऱ्या पहिल्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात 'पथनाट्य' पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. यातून अस्वस्थ वर्तमानाचे चित्र सादर करण्यात येईल. तर राज्यस्तरीय कवी संमेलनातूनही सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक प्रा. जावेद कुरेशी यांनी पत्रकारांना दिली. (Latest Marathi News)

Nagpur:उपराजधानीत होणार पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वैचारिक लेखन आणि ऐतिहासिक लेखनावर होणार चर्चा
Ranji Trophy : छत्तीसगडच्या घातक गोलंदाजीसमोर कर्णधार रहाणेच्या मुंबई संघाची घसरगुंडी! ६१ धावांत गमावले ९ फलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com