Nagpur Forest Officer's Brave Tiger Rescue Operation Goes Viral
esakal
नागपूर : जंगलात हळूहळू अंधार दाटू लागला होता. वेळ कमी होता आणि समोर होते दोन मानवी बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान. पारंपारिक पद्धतीने मचान बांधायला वेळ नव्हता. अशा वेळी वनविभागाच्या इतिहासात कधीही न घडलेला एक थरारक निर्णय घेतला गेला. तो निर्णय होता वाघाला चकवण्यासाठी स्वतःच पिंजऱ्यात कैद होण्याचा.