Forest Department : एसीएफ, आरएफओसह चार जण निलंबित; अवैध वृक्षतोड, गैरप्रकार भोवला, नागपूर वनविभागात खळबळ
Tree Felling : पारशिवनी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह चार जणांना निलंबित करण्यात आले. नागपूर वनविभागात या कारवाईने खळबळ उडाली आहे.
नागपूर : पारशिवनी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र घाडगे, वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, वनपाल वाढई आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे या चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.