esakal | नागपूर : चाकूने भोसकून मित्राचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नागपूर : चाकूने भोसकून मित्राचा खून

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दोघांनी दारू ढोसल्यानंतर गम्मत करीत असताना झालेल्या वादातून युवकाने मित्राच्या पोटात चाकू भोसकला. मित्र गंभीर जखमी अवस्थेत पोटात चाकू घेऊनच शेजारच्या हॉस्पिटलमध्ये गेला. मात्र, त्याचा तासाभरातच मृत्यू झाला. अजय भारती (२५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाश सुनील पुरी (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि आरोपी अजय हे मित्र होते. दोघेही गोसावी आखाडा, बिनाकी मंगळवारी परिसरात राहत होते. दोघे मिळून सेंट्रिंग, डेकोरेशन, मंडपची काम करायचे. नेहमीच त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू रहायची. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास त्यांनी गणपती आणला. दोघांनीही सजावट केली.

हेही वाचा: दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी गेले. दोघेही दारात बसले. त्यानंतर दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच दोघेही सोबतच कमाल चौक येथे दारू पिण्यासाठी गेले. परत आल्यावर दोघांमध्ये गम्मत केल्यावरून बाचाबाची झाली. दोघांनीही कुश्‍ती खेळली. आकाशला पटकणी दिल्याने तो चिडला. आकाशने घरात जाऊन चाकू आणला आणि अजयच्या पोटात खुपसला. तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर आकाश वस्तीत पळाला. गंभीर अवस्थेत अजयच्या भावाने आणि वहिणीने त्याला मेयो रूग्णालयात नेले. रस्त्यातच अजयचा मृत्यू झाला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

पोटात चाकू घेऊन हॉस्पिटलमध्ये

अजयच्या पोटात चाकू भोसकल्यानंतर तो खाली पडला. पोटातील चाकूसह तो जवळच्या समर्पण हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी त्याला बघताच लगेच प्राथमिक उपचार केला आणि त्याला मेयो रुग्णालयात पाठविले. मेयोत पोहचण्यापूर्वीच अजय मरण पावला.

साहेब...मीनचं मारोलो जी...

पळून गेलेला आकाश वस्तीत परत आला. अजयचा खून केल्याचे त्याने नातेवाईकाला सांगितले. नातेवाईकांनी त्याला पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. रक्ताने माखलेल्या हाताने आकाश स्वतःहून पोलिस ठाण्यात आला. ‘साहेब..मीनचं दोस्ताले मारोलो जी...’ असे सांगू लागला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले.

loading image
go to top