Nagpur Pothole Roads : विसर्जनालाही खड्ड्यांचे विघ्न कायम महापालिकेच्या दाव्याची झाली पोलखोल

NMC's Pothole Repair Claims Face Questions : महापालिकेने खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी गजानन शाळा चौक, अजनी, पिपळा रोड, बेसा रोडसह विविध भागांत खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.
Nagpur Pothole Roads

Nagpur Pothole Roads

esakal

Updated on: 

नागपूर : गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र, आगमनावेळीच अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे दिसून आले. आता विसर्जनाची मिरवणूकही खड्डेमय मार्गावरूनच होणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या पर्वावर शुक्रवारी गणरायाचे विसर्जन होईल. मनपाने गणरायाच्या स्थापनेपूर्वीच शहरातील रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याचा दावा केला होता.

परंतु, शहरातील विविध भागांत अमृत-२ योजना तसेच विविध विकासकामांसाठी मुख्य रस्ते आणि वस्त्यांमधील रस्ते खोदण्यात आले आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतरही रस्ते योग्य पद्धतीने पूर्ववत न केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. दक्षिण नागपुरातील गजानन शाळा चौकात कामासाठी केलेल्या खोदकामानंतर मोठा खड्डा पडला आहे.

Nagpur Pothole Roads
Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

त्याच्या पुढील चौकातही रस्त्यालगत खड्डे असून वाहनधारकांना ते चुकवत मार्ग काढावा लागत आहे. तुकडोजी पुतळा चौक, अजनी, नवीन सुभेदार ले-आऊट, पिपळा रोड, बेसा रोड, सावरकर उद्यान आदी भागांतही खड्ड्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत गणरायाच्या मार्गातील हे खड्डेच मोठे विघ्न ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com