
नागपूर : वर्चस्वाचा वाद आणि जुन्या भांडणातून कुख्यात गुंड आणि ड्रग्ज तस्कर समीर शेख ऊर्फ येडा समशेर खान याचा अस्सू सत्तार याच्या टोळीने खून केला. ही घटना गुरुवारी (ता.७) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिस हद्दीतील राजीवनगरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.