Nagpur News: ड्रग्ज तस्करांमध्ये ‘गॅंगवार’; वर्चस्वाच्या वादातून महालच्या कोठी रोड परिसरात मध्यरात्री गोळीबार

Midnight Firing Shocks Nagpur’s Mahal Area: नागपूरच्या महालातील कोठी रोड परिसरात ड्रग्ज तस्करांमधील वर्चस्वाच्या वादातून मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: वर्चस्वाच्या लढाईतून ड्रग्ज तस्करांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोठी रोड येथील नवयुग शाळेजवळ गोळीबार केल्याची घटना रविवारी (ता.१७) साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, या परिसरापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घर काहीच अंतरावर आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सौरभ घाटे (वय २७, रा. कोठी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com