
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आरोपींकडे मोबाईल आणि गांजा आढळून येत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आली आहेत. सत्र न्यायालयात सुनावणीसाठी गेलेला मोक्काचा आरोपी असलेल्या कैद्याकडे आज सोमवारी (ता.५) दुपारच्या सुमारास ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईलच्या बॅटरी आढळल्या आहेत. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी त्याच्याविरोधीत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सूरज कन्हैयालाल कावळे (वय २२ रा. खापरखेडा)असे कैद्याचे नाव आहे. तो मोक्का अंतर्गत कारागृहात शिक्षा भोगत आहे. कच्च्या बंदीवानांना प्रकरणांशी संबंधित दस्तऐवज व माहिती अधिकारांतर्गत मिळालेले दस्तऐवज सोबत ठेवण्याचा अधिकार आहे. आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरजला मोक्का न्यायालय क्रमांक २ येथे
मोक्कातील कैद्याकडे आढळला गांजा
सुनावणीसाठी कारागृहातील शिपायांनी नेले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याला परत कारागृहात आणण्यात आले. यावेळी कारागृहात प्रवेश करताना त्याच्या फाईलला लागलेल्या एका कागदात गांजा आणि मोबाईलच्या बॅटरी आढळून आल्या. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच कुमरे तेथे पोहोचले. त्यानंतर धंतोली पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. धंतोली पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्यासह पोलिसांचा ताफाही तेथे पोहोचला. पोलिसांनी ५१ ग्राम गांजा व १५ मोबाइलच्या बॅटऱ्या जप्त केल्या. याप्रकरणी कावळे याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा उघडकीस आला प्रकार
पेशी संपल्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास सूरज व त्याच्या साथीदारांना पोलिस कारागृहात परतले. कारागृहाच्या आत जाण्याआधी सुरक्षा रक्षकाने बंदीवानाची कसून तपासणी केली पण त्याला काहीही आढळले नाही. अन्य एका रक्षकाने त्याच्याकडील फाइल मागितली. फाइल वजनी वाटली. त्याने तपासणी केली असता दोन कागदांमध्ये गांजाच्या पुड्या चिटकविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अन्य कागदांमध्ये मोबाईलच्या तब्बल १५ बॅटऱ्या आढळल्या.