नागपूर : घरगुती वापराचा गॅस ऑटोमध्ये भरणारी टोळी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस

नागपूर : घरगुती वापराचा गॅस ऑटोमध्ये भरणारी टोळी अटकेत

नागपूर : यशोधरानगरातील कुंदनलाल गुप्तानगर झोपडपट्टी परिसरात अवैधरित्या घरगुती वापराच्या सिलिंडरची गॅस ऑटोमध्ये भरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पथकाने बुधवारी केली असून २२ घरगुती वापराचे सिलिंडरही जप्त केले आहे.

खुर्रम रफिक शेख (वय ३५ रा. कुंदनलाल गुप्ता नगर), नितेश विठ्ठलराव गावंडे (वय ३६ रा. बिडगाव), दीपक शांतीलाल पोपट (वय ४२ रा. मिनीमाता नगर), राहुल देविदास तिडके (वय ३९ रा. कामाक्षी नगर वाठोडा), युनुस शेख अशी आरोपींची नावे आहेत. ते इलेक्‍ट्रीक मशीनच्या साहाय्याने चारचाकी आणि ऑटोमध्ये भरत असल्याची माहिती युनिट २ च्या पथकाला बुधवारी (ता.२५) मिळाली.

त्यानुसार पथकाने दुपारीच यशोधरानगर परिसरात असलेल्या कुंदनलाल गुप्तानगर येथील बंडु किराणा जवळ असलेल्या ठिकाणावर छापा टाकला. यावेळी मुख्य आरोपी खुर्रम रफिक शेख आणि त्याचे इतर तीन साथीदार इलेक्ट्रीक मशीनच्या सहाय्याने ऑटोमध्ये घरगुती वापराचे सिलिंडर गॅस भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

याशिवाय त्यांच्याकडून २२ सिलिंडरसह ६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, यांना अटक केली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक पोलिस निरीक्षक पवार, दीपक मस्के, राजेश तिवारी, संतोष मदनकर, रोनॉल्ड एंथोनी, शेषराव राऊत, सुनिल कुंवर, किशोर ठाकरे, केशव गमे, सचिन आंधळे, आशिष ठाकरे यांनी केली.

युनुस शेख आणायचा सिलिंडर

एच.पी.गॅस एजन्सीचा डिलिव्हरी बॉय असलेला युनुस हा खुर्रम शेख याला सिलिंडरचा पुरवठा करायचा. त्यानंतर या सिलिंडरचा वापर खुर्रम ऑटोमध्ये लावण्यात आलेल्या गॅसकिटसाठी करायचा. त्यासाठी ते ऑटोचालकांकडून पैसे घ्यायचे. साधारणतः घरगुती गॅसच्या माध्यमातून ऑटोंना अधिक ॲव्हरेज मिळत असल्याने त्याला अधिक मागणी असल्याने त्यांचा हा व्यवसाय चांगलाच फोफवला होता.

बेलतरोडी झोपडपट्टी अग्नीकांडाची पुनरावृत्ती टळली

दक्षिण नागपुरातील बेलतारोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे.२० ते २५ सिलेंडर ब्लास्ट झाले होते. ही घटना ९ मे रोजी घडली होती. त्यामुळे संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली होती. यात जिवितहानी झाली नसली तरी शेकडो परिवार रस्त्यावर आले होते. त्यामुळे कुंदनलाल गुप्तानगर ही वस्ती हा दाट लोकवस्तीची आहे. त्यामुळे या परिसरात अशाच प्रकारे ही घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात हानी होऊन शेकडो परिवार रस्त्यावर आले असते. त्यामुळे युनिट २च्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळल्याचेही बोलल्या जात आहे.

Web Title: Nagpur Gas Gang Arrested Domestic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top