Nagpur: नागपूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी; सत्ताधारी, विरोधकांची लागणार कसोटी

विरोधकांना शांत ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न
Nagpur
Nagpuresakal
Updated on

नागपूर: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करण्यात आले. तर दुसरीकडे विरोधकांना आक्रमक होण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. त्यामुळे या सभेत सत्ताधारी व विरोधकांची कसोटी लागणार आहे.

जि.प.मधील अनेक विषयांवरून विरोधकांसोबत सत्ताधारी सदस्य नाराज असल्याचे सांगण्यात येते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. यास काही प्रमाणात यश आल्याचे चित्र आहे. अमृत सरोवरच्या कामावर सत्ताधारीसोबत विरोधकही नाराज आहेत. ही नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आली.

Nagpur
Maharashtra Politics: "आमचा की तुमचा?" त्या बातमीमुळे उडाली राऊतांची झोप, रात्री उशिरा ट्विट करत म्हणाले...

मागील स्थायी समितीच्या बैठकीत जनसुविधा व नागरी सुविधांच्या विषयावरून चांगलेच घमासान झाले होते. पाणी पुरवठा विभागाच्या अनेक कामांवर आक्षेप आहे. एका प्रकरणात अध्यक्षांना चक्क चुकीची माहिती देण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केला.

शिक्षण विभागातील घोटाळाही समोर आला. महिला व बाल कल्याण विभागाचेही प्रश्न आहेत. समोर निवडणुका असल्याने आक्रमक होण्याच्या सूचना वरिष्ठांकडून विरोधकांना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विविध मुद्यांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Nagpur
Best Friend: 'ती स्वप्नात येते, मला बोलाविते'! 'बेस्टफ्रेन्ड'च्या आत्महत्येनंतर तरुणीचा टाेकाचा निर्णय

इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रकरण

इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल समितीने सीईओंकडे सादर केला. समितीने सर्व दोष पुरवठादारावर टाकून गट शिक्षणाधिकाऱ्यांना वाचवण्यात आले. प्रत्यक्षात गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारेचे पुरवठादाराला संपूर्ण बिल अदा करता आले. त्यामुळे समितीच्या अहवालावर प्रश्न निर्माण होत आहे.

फर्निचरचा मुद्दा दडवण्यासाठी हालचाली!

फर्निचरचा मुद्दा विरोधकांकडून उचलण्याची शक्यता आहे. या मुद्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांचीही अडचण होणार आहे. हा मुद्दा सभागृहात विरोधकांकडून उपस्थित होऊ नये,यासाठी संबंधित माजी सभापती व काही सदस्यांकडून हालचाली सुरू झाल्यात. यापूर्वीही सत्ताधारी सदस्यांकडून विरोधकांना फोन गेल्याची चर्चा जोरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com