
नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ वर्षे सश्रम कारावास, पंधरा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच महिन्यांची शिक्षा सुनावली. त्याच्या विरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता.
जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला. आरोपी पिता पचराशी होता. तर, पीडितेची आई खाजगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्यांना दोन मुली आहेत. यातील १३ वर्षीय मोठ्या मुलीवर पत्नी कामासाठी बाहेर गेल्यावर नराधम पिता बलात्कार करीत असे. मुलगी चार वर्षांची असताना या प्रकाराची सुरुवात होताच मुलीने आईकडे तक्रार केली होती.
मात्र, सुरेशने तिला धमकावले व आपण जे काही सांगितले ते खोटे होते असे सांगण्यास बाध्य केले. मुलीनेही तसेच केल्याने आईने तक्रार खोटी असल्याचे गृहित धरले. मात्र, पुढे अनेक वर्षे हा प्रकार सुरूच राहिला. गंभीर बाब म्हणजे आरोपीने या सुमारास तीन वेळा तिची गर्भधारणा चाचणीसुद्धा केली.
सगळी परिस्थिती माहिती असतानाही आईने तक्रार न दिल्याने मुलगी वैफल्यग्रस्त झाली. तिने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. आईने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. अखेर चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने आईने हिम्मत करून जवळपास वर्षभरानंतर २० जानेवारी २०१८ रोजी पोलिस तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. यात १२ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सर्व बाजू लक्षात घेत न्यायालयाने आरोपी पित्यास शिक्षा सुनावली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वर्षा सायखेडकर यांनी बाजू मांडली.
दबा धरून बसत आईने पकडले रंगेहाथ
पित्याने धमकाविल्याने पीडित मुलगी अनेक वर्षे गप्प होती. आईनेही तिच्यावर विश्वास न ठेवल्याने पीडितेने शाळेतील शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. शाळा व्यवस्थापनाने आईला बोलावून ही माहिती दिली. यावर आईने आरोपीवर पाळत ठेवण्याचे ठरविले. १६ डिसेंबर २०१६ रोजी तिची आई घरातील स्टोअर रूममध्ये लपून बसली. या नराधमाने त्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला. मुलगी घरी एकटी असल्याचा गैरसमज करून त्याने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. आईने या प्रकाराचे व्हिडीओ शुटिंग केले व आरोपीला रंगेहात पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.