KBC: गिट्टीखदानच्या मुलीने केबीसीत जिंकले २५ लाख रुपये १२ वर्षीय स्पृहा शिनखेडेच्या अद्भुत सामान्य ज्ञानाने ‘बिग बी’ ही प्रभावित
Amitabh Bachchan: नागपूरची १२ वर्षीय स्पृहा शिनखेडे हिने केबीसी ज्युनिअरमध्ये तल्लख बुध्दी आणि सामान्य ज्ञानाचे प्रदर्शन करत २५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. अमिताभ बच्चन यांनी तिच्या ज्ञानाचे कौतुक करत महाराष्ट्राचा मान उंचावला.
नागपूर : गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय स्पृहा तुषार शिनखेडे हिने तल्लख बुद्धी व अद्भुत सामान्य ज्ञानाचा परिचय देत केबीसी ज्युनिअरमध्ये तब्बल २५ लाख रुपयांची धनराशी जिंकली आहे.