Nagpur : चक्क तरुणीने केले चैनस्नॅचिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur girl theft gold chain

Nagpur : चक्क तरुणीने केले चैनस्नॅचिंग

नागपूर : शहरात वाढलेल्या चैनस्नॅचिंगच्या सर्वच घटनांमध्ये आरोपी तरुण असताना शुक्रवारी धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्ण पार्कजवळ चक्क दोन तरुणींनी दुचाकीवरुन येत महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले. ही घटना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.नागपुरातील ही तरुणींकडून अशाप्रकारे चोरी करण्याची पहिलीच घटना असावी. विशेष म्हणजे तिच्यासोबत असलेली लुटमार करणारी दुसरी तरूणी चक्क मद्याच्या नशेद धुंद होती. मात्र, महिलेने दाखविलेल्या समयसुचकतेमुळे दोन्ही तरुणींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

अरुंधती देवेंद्र तगनपल्लीवार (वय ५३ रा. विवेकानंदनगर, धंतोली) या सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धंतोली परिसरातील रामकृष्ण पार्क समोरून फिरत होत्या. यावेळी त्यांना मागून दुचाकीवरून येणाऱ्या २० ते २२ वयोगटातील दोन तरुणींनी आवाज दिला. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघताच, त्यांच्या गळ्यातीळ सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अरुंधती यांनी समयसुचकता दाखवित, मागे बसलेल्या तरुणीचा हात पकडला आणि ओढले. त्यामुळे ती दुचाकीवरुन पडली.

अरुंधती यांनी आरडाओरड केल्याने पळून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणीला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभा एकुर्ले यांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही तरुणींना ताब्यात घेत, त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत, त्यांना अटक केली आहे.

मुली दारूच्या नशेत ?

चेनस्नॅचिंग करणाऱ्या दोन तरुणींपैकी एक तरुणी दारुच्या नशेत धुंद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी एक तरुणीवर गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील इतिहासही आहे. तिचा भाऊ आणि आई हे दोघेही विविध गुन्ह्यात कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र, आजपर्यंतच्या इतिहासात मुलींकडून असा प्रकार केल्याची पहिलीच घटना असल्याचे दिसून येत आहे.

मंगळसुत्रही निघाले ‘नकली’

सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करताना अडकलेल्या तरुणींनी जे मंगळसुत्र चोरण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात ते मंगळसुत्रही नकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारात ‘खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ असाच प्रकार झाल्याचे दिसून आले.

Web Title: Nagpur Girl Theft Gold Chain Drunk Woman Police Arrested Thief Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..