Nagpur: सोने-चांदी महागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold
सोने-चांदी महागली

नागपूर : सोने-चांदी महागली

नागपूर : कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून खरेदीसाठी बाहेर न पडलेल्या ग्राहकांनी दिवाळीत सोने व चांदीची तुफान खरेदी केली. दिवाळीच्या काळात सोने- चांदीचे भाव कमी असल्याने दागिने खरेदीवर भर दिला. ऐन दिवाळीत लग्नसराईची खरेदी केल्याने २०० कोटींपेक्षा अधिकची उलाढालीनंतर आता सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु झालेली आहे.

एकाच दिवसात आज प्रति दहा ग्रॅम सोने १००० तर तर चांदी प्रति किलो १३०० रुपयांनी वाढली आहे. बुधवारी सकाळी दहा ग्रॅम सोन्याचा दर ४८ हजार ६०० रुपये होता. ते आज ४९ हजार ६०० रुपयावर गेला आहे. तर चांदी प्रति किलो ६५ हजार ६०० रुपये होती. ती आता ६७ हजार ३०० रुपयावर गेली आहे. दिवाळीनंतर सोन्या- चांदीच्या दरात वाढ होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार भाव वाढलेले आहे. सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करून ठेवतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव स्थिरावलेले असते. आता दिवाळीची खरेदी संपली असून लग्नसराईच्या खरेदीला व्यापाऱ्यांनी सोने- कोट चांदीची खरेदी सुरु केली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ होत आहे. येत्या काही दिवसात सोने ६५ हजार प्रति दहा ग्रॅम होण्याची शक्यता आहे. चांदीचे दरही वाढणार आहेत. सोन्याच्या दरात झपाट्याने भाव वाढ होत आहे. राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स.

loading image
go to top