नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून (Nagpur Crime) एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका सरकारी मुलींच्या वसतिगृहात (Government Girls Hostel) मध्यरात्री काही अज्ञात आरोपी घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विशेष म्हणजे, वसतिगृहात ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना पुरेशी सुरक्षा व्यवस्था, त्यामुळे या घटनेनंतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.