Nagpur Graduate Constituency Election
esakal
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांकडूनच मतदानाच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. नागपूर विभागातील या निवडणुकीत तब्बल १५ हजार ३२ मते अवैध ठरली. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना झालेल्या चुका या मतबादाचे प्रमुख कारण ठरल्या. पदवीधर मतदारांकडून इतक्या मोठ्या संख्येने चुका होणे, ही बाब त्यांच्या मतदानविषयक जागरूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. त्यामुळे खरंच त्यांनी पदवी घेतली का? असा सवाल उपस्थित होत आहे.