Nagpur graduate election second preference vote counting
esakal
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांना निर्णायक महत्त्व प्राप्त होणार आहे. निवडणुकीतील कोटा पूर्ण करण्यासाठी सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांना अनुक्रमे १४ हजार ५१४ आणि १८ हजार ८०८ मतांची आवश्यकता (Nagpur Graduate Constituency Election) आहे. त्यामुळे बाद होणाऱ्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीक्रमाची मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असेल.