कार्यालयात सहकारी महिलेशी अश्‍लील चाळे | nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेशी अश्‍लील चाळे

नागपूर : कार्यालयात सहकारी महिलेशी अश्‍लील चाळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वे कार्यालयातील सहकारी महिलेचा जातिवाचक शिवीगाळ आणि अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. वाणिज्य व्यवस्थापक विकासकुमार कश्यप (४२) आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक अविनाशकुमार आनंद (४५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पीडित महिला या रेल्वे विभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दोन्ही अधिकारी हे पीडित महिलेला त्रास देण्याच्या हेतूने वारंवार त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावीत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या कामात चुका काढून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करीत होते. हातातील कागदपत्रे जमिनीवर फेकून महिलेला उचलायला लावत होते. एखादी फाइल महिला घेऊन गेल्यास तिला जवळ बोलावून हाताने तिला स्पर्श करून तिच्या केसाला हात लावत असल्याचे प्रकार खूप दिवसांपासून दोन्ही अधिकारी करीत होते. महिलेने बदनामीच्या भीतीपोटी कुठेही वाच्यता केली नव्हती.

हेही वाचा: सांगली : मधुमेही रुग्णांमध्ये कोविडचा मृत्युदर सर्वाधिक

महिलेची प्रकृती बरी नसताना त्याचदिवशी आभासी पद्धतीने बैठक होती. महिलेने तिची प्रकृती बरी नसल्याचे कश्यप यांच्या स्टेनोला सांगितले होते. तरीही शिवीगाळ करीत तिला आपल्या केबिनमध्ये बोलविले. काही दिवसांपूर्वी पीडित महिला ही उपचारासाठी हॉस्पिटल येथे गेली असता आनंद यांनी तिला फोन केला. महिलेने फोन न उचलल्याने पुन्हा तिला शिवीगाळ करून ‘फोन क्यू नही उठाते’ असे बोलून पुन्हा शिव्या दिल्या. हा छळ असह्य झाल्याने महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून शेवटी दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top