Nagpur Missing Boy News
esakal
नागपूर : गिट्टी खदान परिसरात गुरुवार हनुमान जयंती च्या मिरवणुकीतून १४ वर्षीय मुलगा मिसिंग झाल्याने नागिरकांनी रोष व्यक्त करीत आज सकाळपासून गिट्टीखदानचा मुख्य रस्ता जॅम केला. यावेळी मुलाचे फलक हातात घेऊन नारेबाजी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.