
नागपूर : केंद्रीय नियमांनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या पात्र व्यक्तीचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त झाले तरी त्याचे नाव यादीतून वगळता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले आहे. अनुकंपा नियुक्तीच्या याचिकेवर निकाल देताना जेव्हा यादीत अर्जदाराचा क्रमांक येईल, तेव्हा त्याला नोकरी द्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले.