Court: संशयाच्या आधारावर खटला चालवणे कायद्याचा दुरुपयोग; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Nagpur High Court : नागपूर उच्च न्यायालयाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येशी संबंधित प्रकरणातील आरोपीविरुद्ध केवळ संशयाच्या आधारावर खटला सुरू करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने या गुन्ह्याचे रद्द करण्याचे आदेश दिले.
नागपूर : केवळ संशयाच्या आधारावर एखादा खटला चालविणे चूक आहे. तसे करणे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यासारखे होईल, असे निरीक्षण महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवले.