नागपूर : वातावरणाचा फटका, खरिपाची वाताहत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur heavy rain Bhiwapur farmer crop damage

नागपूर : वातावरणाचा फटका, खरिपाची वाताहत

नांद : ‌जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले. सततच्या मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामाची वाताहत झाली.तालुक्यात घेतलेल्या विविध पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदाच्या पावसाने आतापर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडले आहेत. भिवापूर तालुक्यात दरवर्षी सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतर पाऊस सतत सुरूच राहात असल्याने पिकांची मशागत करताच आली नाही. संततधार पावसाने पिकात मोठ्या प्रमाणावर तण, कचरा वाढल्यानेही पिकांची वाढ खुंटली. पिकांच्या वाढीसाठी उन्ह आवश्यक असताना दीड महिना उन्हच मिळाले नाही. आता ढगाळ वातावरणानेही पिकांची वाढ खुंटली आहे.

भिवापूर तालुक्यात व नांद परिसरात मुख्य पीक सोयाबीन व कापूस हेच आहे. त्यानंतर हळद, तूर व धान पिके आहेत. सोयाबिनची पेरणी व कापसाची लागवड झाली. त्यावेळी शेतकऱ्यांनी खताची मात्रा दिली. पण दुसरी मात्र पावसामुळे मिळू शकली नाही. त्यामुळे सोयाबीन व कापसाची वाढ झाली नाही. शेतात सतत पाऊस येत असल्याने आणि सतत ओलावा असल्याने रोपट्यांना ऑक्सिजन व सूर्यकिरण मिळू शकले नाही. अशातच पिकांची मुळेसुध्दा जमिनीत रुजलेली नाहीत. त्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर पिकांचाही उत्पादनावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. ज्यांचे शेत नाल्याच्या काठावर आहेत, तेथील सोयाबीन व कापूस व इतर पिक वाहून गेली आहेत.

काहींची शेतजमिन खरडून गेली. गतवर्षी कापसाला व सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकरी जास्त प्रमाणात सोयाबीन पिकाकडे वळला. त्यानंतर त्या खालोखाल कापूस पिकाकडे वळला आहे. कापूस पिकांपेक्षा सोयाबीनचा पेरा हा ५००० हजार हेक्टरने जास्त प्रमाणात आहे. पण लागवड झाल्यानंतर काही दिवसांनी पावसाला जोरदार सुरुवात झाली. सोयाबीन, हळद, तूर व कपाशीच्या वाढीसाठी उन्ह गेल्यातच जमा आहे. पाऊससुद्धा कमी लागतो. पण गत काही दिवसापासून उन्हाचा पत्ताच लागत नाही आहे.

प्रती हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या !

नांद परिसरात दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे शेतकरी हा पिकातील तण कचरा काढण्याच्या तयारीला लागला असून तणनाशक फवारणी सुद्धा काही शेतकरी करीत आहेत. कारण तण काढण्याकरीता मजूर मिळेनासे झाले आहेत. बरेचसे शेतकरी भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरवर्ग बोलावून त्यांना २०० ते २३० रूपये मजुरी देऊन पिकातील तण काढत आहेत. नांद जिल्हा परिषद सर्कल परिसरातील शेतकरी ओला दुष्काळ घोषित करून शासनाने ५० हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळली

नरखेड : शनिवारच्या दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नगरातील प्रभाग क्र.२मधील ७० वर्षीय वृद्ध महिला कुसुम मारोतरावजी वेरूळकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले. घटनेच्या वेळी संपूर्ण कुटुंब घरातच होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भी या घटनेत जीवनावश्‍यक वस्तू मातीच्या दिगाऱ्याखाली दबल्या. या घटनेत पीडित वृद्धेचे जवळपास एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समझते. वृद्ध महिलेची परिस्थिती हलाखीची असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. पीडित महिलेने तहसीलदारांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

यंदा किती उत्पादन होईल, हे सांगता येणार नाही. शेतकरी कर्ज काढून शेती करतो. पण पिकाचे उत्पादन झाले नाही तर कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भिवापूर तालुका हा ओला दुष्काळ घोषित करावा.

-भक्तदास चुटे, युवा शेतकरी नांद व बाजार समित संचालक, भिवापूर

Web Title: Nagpur Heavy Rain Bhiwapur Weather Farmer Crop Damage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..