नागपूर : शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur heavy rain crop damage Movement for farmers benefit

नागपूर : शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन

रामटेक - राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळण्याकरिता आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करुन त्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीचे एक निवेदन यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनानुसार राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच कर्जात सापडलेला शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आलेला असून त्याच्यावर प्रचंड आर्थिक संकट ओढवले आहे. निवेदन देतेवेळी राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अॅड.आनंद गजभिये, उपाध्यक्ष कॉ.शंकर कुमरे, कॉ.नत्थू परतेती, सहसचिव कॉ.राधेश्याम मेश्राम, छोटू वाळके, दयाराम गोवर्धन, शेषराम मसराम, प्रा.ओंकार आस्टणकर, चंद्रशेखर मेश्राम, वामन मांढरे, सुखदास सहारे, बंसीलाल पारधी, प्रभुदास नागफासे, जयप्रकाश वैध, मोकासी कोळवते, अनिल कोडवते, पंचफुला तुमडाम, लिलाबाई उईके, इंदरलाल आतराम, जयदेव बापूराव रणदिवे, सुखराम उईकें उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  • अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांना यापूर्वी सांगली व कोल्हापूर भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे त्वरित मदत द्यावी.

  • जिल्ह्यातील जबरन जोत शेतकऱ्यांना वन जमिनीचे पट्टे द्यावे.

  • नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दरहेक्टरी ४० हजार रुपये मदतद्या.

  • नव हक्कधारकांचे प्रलंबित दावे व पुनर्विचार दावे मंजूर करण्यात यावे. भूविकास बॅंकेच्या कर्जधारक शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी घोषित केली असल्याने ७/१२ उताऱ्यावरील कर्जबोजे कमी करण्यात यावे.

  • रामटेक उपविभागातील अतिवृष्टीने पीडित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना दरहेक्टरी ४० हजार रुपये मदत देण्यात यावी.

Web Title: Nagpur Heavy Rain Crop Damage Movement For Farmers Benefit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..