ढगफुटीसारखा पाऊस, घरांमध्ये पाणी; नागपूरच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Nagpur Heavy Rain : नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. हा पाऊस अभूतपूर्व स्वरूपाचा असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis on Nagpur Heavy Rain

Devendra Fadnavis on Nagpur Heavy Rain

esakal

Updated on

नागपुरात अवघ्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हा पाऊस अभूतपूर्व स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. एका दिवसात सुमारे १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी तब्बल ११० मिलिमीटर पाऊस केवळ सव्वा ते दीड तासांच्या कालावधीत कोसळला. त्यामुळे काही भागांत ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com