

नागपूर : न्यायालयीन सुनावणीच्या लाईव्हस्ट्रीम व्हिडिओंचा कंटेंट क्रिएटर्सकडून गैरवापर केला जातो. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. अशा कंटेंट क्रिएटर्सकडून न्यायालयीन सुनावणीच्या छोट्या-छोट्या क्लिप्स तयार केल्या जातात. अनेकदा झालेली सुनावणी सनसनाटी असल्याच्या नावाने प्रसिद्ध करीत चुकीची माहिती पसरवत असल्याची खंतही व्यक्त केली.