Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Kidney Sale Scam: नागपूर उच्च न्यायालयाने डॉ. रवींद्रपाल सिंगच्या किडनी विक्री प्रकरणातील अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. ट्रांझिट बेल असूनही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: एखाद्या आरोपीला अटक झाल्यानंतर ट्रांझिट बेलच्या स्वरूपात अंतरिम दिलासा मिळाला असला तरी अटकपूर्व जामिनाचा अधिकार राहत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.

या निर्णयासह नागभीड (जि. चंद्रपूर) येथील रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणातून उघड झालेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com