
Nagpur Court
sakal
नागपूर : परदेशी नागरिकांसाठी राज्यामध्ये डिटेन्शन कॅम्प नसल्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांभीर्याने घेतला आहे. एका प्रकरणात नायजेरियन नागरिकाला ‘डिटेन्शन कॅम्प''मध्ये ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर डिटेन्शन कॅम्प नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर, याची स्वतः न्यायालयाने दखल घेत यावर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.