esakal | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचा दणका, हे आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

devendra Fadanvis

 2014 विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदासोबतच गृहखाते, नगरविकास खाते यासह अन्य खाते होते. त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शासनाच्या या विभागामधील कर्मचाऱ्यांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये होते. मात्र, आता कर्मचाऱ्यांचे वेतन खाते ऍक्‍सिस बॅंकेमध्ये वळविण्यात आले आहेत. फडणवीसांच्या पत्नी या बॅंकेच्या उपाध्यक्षपदी असल्यामुळे हेतुपुरस्कररीत्या हे करण्यात आले आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचा दणका, हे आहे कारण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्याच्या पोलिस आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते ऍक्‍सीस बॅंकेमध्ये वळवल्याचा आरोप करीत ऍड. सतीश उके यांनी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने आठ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

 2014 विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदासोबतच गृहखाते, नगरविकास खाते यासह अन्य खाते होते. त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शासनाच्या या विभागामधील कर्मचाऱ्यांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये होते. मात्र, आता कर्मचाऱ्यांचे वेतन खाते ऍक्‍सिस बॅंकेमध्ये वळविण्यात आले आहेत. फडणवीसांच्या पत्नी या बॅंकेच्या उपाध्यक्षपदी असल्यामुळे हेतुपुरस्कररीत्या हे करण्यात आले आहे. 

तब्बल 38 खून करणारे नक्षल दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात

त्यामुळे, खाजगी बॅंकेला फायदा होणार असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. मागील सुनावणीमध्ये या प्रकरणाचे कागदपत्र तपासण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते.

याचिकाकर्त्यांतर्फे अ ॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. वैभव जगताप यांनी सहकार्य केले. राज्य सरकारतर्फे अॅड. आनंद फुलझेले यांनी बाजू मांडली. याप्रकरणी न्या. रवी देशपांडे, न्या. अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली.

loading image