

Nagpur Retired Professors
sakal
नागपूर : विदर्भातील निवृत्त ३०८ प्राध्यापकांच्या वाढीव ग्रॅज्युईटीवर निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य सचिवांना दिले. या वाढीव २० लाख रुपयांच्या ग्रॅज्युईटीवर निर्णयासाठी ८ आठवड्यांचा अवधी दिला. प्रकाश तायडे यांच्यासह ३०८ निवृत्त प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.