Construction Slab Collapses During Heavy Rain: नागपूरच्या हिंगणा मार्गावरील भागीरथा पार्क परिसरात वादळी पावसादरम्यान निर्माणाधीन सज्ज्याचा स्लॅब आणि भिंत कोसळून चार वर्षीय दैविक चन्ने याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नागपूर: शहर आणि परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान निर्माणाधीन सज्ज्याचा स्लॅब अंगावर पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा मार्गावरील भागीरथा पार्क येथे घडली.