नागपूर : विद्यार्थिनीच्या डोक्यावर हातोड्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur hitting student her on head with hammer Attempt to kill case

नागपूर : विद्यार्थिनीच्या डोक्यावर हातोड्याने वार

नागपूर : माथेफिरू युवकाने हातोड्याने डोक्यावर वार करून विद्यार्थिनीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी अजनीतील एका कॉम्प्युटर सेंटरजवळ घडली. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अजनी पोलिसांनी माथेफिरू युवकाला ताब्यात घेतले आहे. चेतना (वय १८, बदललेले नाव) असे जखमी विद्यार्थिनीचे तर चेतन लिखारा (वय ३५, रा. नरेंद्रनगर) असे माथेफिरू युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतना शिकत असून संगणकाचे प्रशिक्षण घेत आहे. दुपारी ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे आली. पायरी चढत असताना चेतनने तिच्या डोक्यावर दोनवेळा हातोड्याने वार केले व फरार झाला.

प्रशिक्षण केंद्रातील शिक्षकांनी तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन चेतनला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चेतना हा मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली. वृत्त लिहिपर्यंत अजनी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.