Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Grandmother Allegedly Throws Boiling Water on 4-Year-Old Boy : नागपूरच्या कोराडी परिसरात होळी खेळताना रंग उडवल्याच्या रागातून आजीने चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगा गंभीर भाजला असून उपचार सुरू आहेत.
Nagpur viral CCTV video

Nagpur viral CCTV video

esakal

Updated on

नागपूर : शहरातील कोराडी परिसरात अत्यंत संतापजनक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. होळी खेळताना अंगावर रंग उडवला (Nagpur Holi Incident) म्हणून संतापलेल्या एका आजीने स्वतःच्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com