
नागपूर : सकाळ समूह, सप्तरंग संगीत अकादमीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, १३ ऑगस्ट रोजी ‘ए मेरे प्यारे वतन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीर सैनिकांना समर्पित या कार्यक्रमात देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर माता, वीर पत्नी तसेच सेनापदक मिळालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला. शहीद वीर जवानांना यावेळी अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम शंकरनगर येथील साई सभागृहात पार पडला.