Nagpur News: हॉस्पिटलमधील पाण्याच्या टाकीत पडून युवकाचा मृत्यू
Water Tank: नागपूरच्या वरूणा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेने निष्काळजीपणाचा प्रश्न उपस्थित. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून हॉस्पिटल सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
नागपूर : बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरूणा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१६) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.