Nagpur Hospital Fire Safety: उपचारांचा बाजार, रुग्ण धोक्यात; ३२७ रुग्णालये अग्निसुरक्षेत अपयशी; तीन हॉस्पिटल सील

327 Hospitals Fail Fire Safety Audit in Nagpur: नागपूरमध्ये अग्निसुरक्षा ऑडिटदरम्यान ३२७ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या. ९४ रुग्णालये अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असल्याचे समोर आले असून तीन अतिधोकादायक रुग्णालये सील करण्यात आली.
Nagpur Hospital Fire Safety

Nagpur Hospital Fire Safety

esakal

Updated on

नागपूर: अग्निशमन दलाने रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांची विशेष फायर सेफ्टी ऑडिट मोहीम राबविली. त्यात शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३२७ रुग्णालये अग्निसुरक्षेत अपयशी ठरली. ९४ खासगी रुग्णालये वैद्यकीय वापरासाठी मान्यता नसलेल्या अथवा अनधिकृत इमारतींमधून सुरू असल्याचे आढळून आले आहे, तर तीन अतिधोकादायक रुग्णालये सील करण्यात आली. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com