नागपूर : एक्‍स रे काढण्यासाठी जीवघेणी प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur hospital

नागपूर : एक्‍स रे काढण्यासाठी जीवघेणी प्रतीक्षा

नागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना ‘गोल्डन अवर''मध्ये उपचार व्हावे, त्यांचा जीव वाचावा, या हेतूने २५ कोटी रुपये खर्चून ट्रॉमा युनिट तयार केले. ट्रॉमात युनिटमध्ये विशेष ट्रॉईज एरिया तयार केला, मात्र सहा महिन्यांपासून उंदरांनी कुरतडून बंद पाडलेली एक्स रे मशिन दुरुस्त करण्यात आली नाही, यामुळे गंभीर रुग्णांना रुग्णांना स्ट्रेचरवरून अर्धा किलोमीटरचे अंतर कापून मेडिकलच्या एक्स रे विभागात पाठवले जाते.

यामुळे अपघाती रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असलेला गोल्डन अवर एक्स रे काढण्याच्या प्रतीक्षेत जातो. गंभीर जखमींना एक्स रे काढण्यासाठी जीवघेणी प्रतीक्षा करावा लागते. मेडिकलमध्ये अपघात जख्मी रुग्णांना तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, त्यांचा जीव वाचविला जावा, हा शासकीय रुग्णालयाचा हेतू आहे. परंतु मेडिकल गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघातात गंभीर जखमी रुग्ण स्ट्रेचरवर आणताच त्याला स्थिर करण्याऐवजी थेट एक्स रे काढण्याचा सल्ला दिला जातो.

एकाच छत्राखाली सर्व उपचार व्हावे रुग्णांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश यावे यासाठी २५ कोटीचा ‘ट्रॉमा’ तयार केला, परंतु येथील सहा महिन्यांपूर्वी येथील एक्‍स-रे यंत्राची सर्व वायर उंदरांनी कुरतडले. यामुळे हे यंत्र पडले आहे. दुरुस्तीसाठी केवळ कागदोपत्री हालचाल होते, प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून हे यंत्र बंद आहे.

यामुळे ट्रॉमामध्ये रात्री-अपरात्री अपघातातील जखमी रुग्ण आल्यानंतर मेडिकलच्या एक्स रे विभागातून एक्स रे काढण्यासाठी जावे लागते. दर दिवसाला मेडिकलच्या एक्स रे विभागात चारशेपेक्षा अधिक रुग्णांचा एक्स रे काढला जातो, तर ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या दररोज १५ ते २० अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना रात्री-अपरात्री एक्स रे काढण्यासाठी मेडिकलमध्ये पाठवण्यात येते. दररोज १५ ते २० रुग्णांचा जीव धोक्यात असतो.

रुग्णांची गर्दी

गंभीर रुग्ण आल्यास तत्काळ एक्स रे काढण्यात यावा, परंतु ट्रॉमातून मेडिकलमध्ये (८६ क्रमांक) आधीच वॉर्डातील तसेच किरकोळ रुग्णांची एक्स रे काढण्यासाठी गर्दी असते. त्यात ट्रॉमातून पाठवण्यात आलेल्या रुग्णांमुळे गर्दी होते. मेडिकलमध्ये रात्रीच्या वेळेस मेडिकलच्या विविध वॉर्डातून तसेच मेडिसीन, सर्जरी कॅज्युल्टीतूही एक्स रे काढण्यासाठी पाठवण्यात येतात. यामुळे रेडिओलॉजी विभागात एक्स रे काढण्यासाठी दोन तीन तास प्रतीक्षा करावी लागते. यामुळे गरीब रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येण्याची भीती आहे.

Web Title: Nagpur Hospital X Ray Machine Turned Off Medical Department Patients Inconvenience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..