

Nagpur News
sakal
नागपूर : मागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य शासनातर्फे मानव विकास कार्यक्रम सुरू केला होता. माता व बालमृत्यूवर नियंत्रण मिळवणे या हेतूने स्त्री व बालरोग तज्ज्ञांकडून गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच ० ते ६ महिन्याच्या शिशूंची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचाराची सोय या मिशनतर्फे केली जात होती. परंतु पाच दिवसांपूर्वी मानव विकास आयुक्तालयाने आरोग्य शिबिर घेणे बंद करावे. निधी मिळणार नाही, असे पत्र जारी केले.