esakal | Nagpur: परिचारिका व्यवसायातील सुजाता नावाची माय
sakal

बोलून बातमी शोधा

सुजाता

नागपूर : परिचारिका व्यवसायातील सुजाता नावाची माय

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : कोरोनाच्या काळात सारे जग धास्तावले होते. रक्ताचे नाते दुरावले होते. हरऐक जण एकमेकांजवळ जाण्यास भीत होते. डॉक्टरही पाच फूट दुरूनच उपचार करीत होते. अशा जीवघेण्या अवस्थेत नागपुरातील मेडिकलच्या लिफ्टमध्ये गर्भवती मातेला प्रसूती कळा आल्या नव्हेतर बाळाचे डोकं बाहेर निघालं. डॉक्टरांना वार्ता दिली, मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये आणा असे फर्मान सोडले होते. अशावेळी प्रसंगावधान साधून जिवाची पर्वा न करता, अंगावर संरक्षणासाठी पीपीई किट नसतानाही ती पुढे सरसावली आणि त्या गरीब मातेची प्रसूती केली. कोरोनाचा विषाणू दंश करेलच शंभर टक्के माहिती असतानाही धैर्य व सेवाधर्म निभावणारी सुजाता सिस्टर.

मेडिकलचा तो जीवघेणा प्रसंग अजूनही मेडिकलमधील परिचारिका, मेट्रन वैशाली तायडेही विसरल्या नाहीत. गर्भवाती माता सुनीता वाघमारे प्रसूती आली होती. तिला प्रसूती कळा आल्या. लिफ्टमध्ये ती होती. लिफ्टमधून नेत असताना बाळाचे डोकं बाहेर आले. धावाधाव सुरू झाली. अशातच येथून सुजाता सिस्टर येत होत्या, त्यांना हे दृश्य दिसले, त्यांनी तत्काळ निवासी डॉक्टरांना बोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ ठरला.

हेही वाचा: मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

अखेर करुणेची किनार असलेली परिचारिका व्यवसायातील सुजाता नावाची माय धावून आली. मानवता सेवेचा वटवृक्ष आजही जिवंत असल्याचे या सिस्टरने दाखवून दिले. बाहेर निघत असलेले बाळ सुजाताने अलगत हातावर घेतले. बाळ सिस्टरच्या हातावरच रडले. नंतर कोरोनाबाधितांच्या महिला वॉर्डातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले. समाजाला आज अशा आधुनिक फ्लॉरेन्स नाईटिंगेलची गरज आहे.

मेडिकलमध्ये येणारे रुग्ण गरीब वस्तीतील असतात. त्यांच्याजवळ पैसा नसतो. ते दुःखी असतात. या दुःखितांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर उमटलेले हसू हीच परिचर्या व्यवसायाची शिदोरी आहे. याच हेतूने परिचर्या व्यवसायात आले. असे प्रसंग घडतात, मात्र हे परिचारिका असो की, डॉक्टर साऱ्यांचे कर्तव्य आहे.

- सिस्टर सुजाता, मेडिकल

loading image
go to top