नागपूर : दारू पिण्यास मनाई केल्याने पतीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करूण अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband commits suicide in Nagpur

नागपूर : दारू पिण्यास मनाई केल्याने पतीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करूण अंत

sakal_logo
By
- अनिल कांबळे

नागपूर ः पत्नीने दारू पिण्यास वारंवार मनाई केल्यामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोनेगाव परीसरात उघडकीस आली. संकेत नरेंद्र कोंडलवार (३०, रा. पावनभूमी) असे मृताचे नाव आहे. अशाप्रकारहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा करूण अंत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत कोंडलवार हा एका व्यापाऱ्यांकडे रखवालदारीचे काम करीत होता. तसेच तो पेंटिंगचे ठेकेही घेत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याचे स्वाती (वय १८) या युवतीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, स्वातीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्याने यावर्षी फेब्रूवारी महिन्यात स्वातीसोबत प्रेमविवाह केला. लग्न केल्यानंतर दोघांनी पावनभूमी येथे किरायाने रूम घेतली.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

लग्न झाल्यानंतर त्याची दारू पिण्याची सवय वाढली. तो रोज दारू पिऊन घरी यायला लागला. त्यामुळे स्वाती त्याला दारू पिण्यास मनाई करीत होती. दारू पिऊन आल्यानंतर तो स्वातीला त्रस्त करीत होता. त्यामुळे स्वाती त्याच्या दारूच्या सवयीला कंटाळली होती. बुधवारी तो दारू पिऊन घरी आल्यानंतर स्वातीने त्याला दारू सोडण्यावरून वाद घातला. त्याने रागाच्या भरात त्याने दुपारी बारा वाजता घरात लोखंडी अँगलला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

loading image
go to top